विश्‍वजीत राणे यांच्या पर्येतील सभेत दगडफेक

0
83

>> वाळपई पोलिसांत तक्रार नोंद

पर्ये भूमिका मंदिरात काल रात्री ७.४५ वाजता वाळपईचे आमदार विश्‍वजीत राणे यांची सभा सुरू असताना विरोधकांनी दगडफेक करून उधळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी वाळपई पोलीस स्थानकात पर्ये पंचायतीचे पंच सदस्य अनिल लक्ष्मण माजीक यांनी दिलेल्या तक्रारीत संशयित म्हणून दहा व्यक्तींची नावे पोलिसांना देण्यात आली आहेत.
पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काल भूमिका मंदिरात आमदार विश्‍वजीत राणे यांची सभा सुरू होती. अनेक वक्त्यांची भाषणे संपली होती. आमदार विश्‍वजीत राणे यांचे भाषण सुरू व्हायच्या अगोदर विरोधकांनी दगडफेक, शिवीगाळ करून सभास्थळी असलेल्या विश्‍वजित यांच्या समर्थकांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर गोंधळ झाल्याने सभा आटोपती घेण्यात आली. तक्रारदार माजीक यांनी संशयित म्हणून विष्णू महादेव सावंत, सुरेश सावंत, राजू सावंत, नारायण सावंत, वीरेंद्र राणे, दिलीप पर्येकर, अनंत राणे व इतर दहाजणांविरुध्द तक्रार दिली आहे. पोलीस तक्रार करण्यासाठी आमदार विश्‍वजीत राणे आपल्या समर्थकांसमवेत वाळपई स्थानकावर आले होते.