विश्‍वजित राणे अपात्रता प्रकरणी न्यायालयाची सभापतींना नोटीस

0
92

वाळपईचे माजी आमदार विश्‍वजित राणे अपात्रता प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने विधानसभेचे सभापती व हंगामी सभापतींना नोटीस पाठविली असून दि. ७ जूनपर्यंत वरील प्रकरणी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
राणे यांच्या वकिलांनी वरील प्रकरणी अर्जदाराने न्यायालयात जाण्यापूर्वी सभापतींकडे जाण्याची गरज होती, असा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला. कॉंग्रेस पक्षाचा व्हीप धुडकावून विश्‍वजित राणे हे पर्रीकर सरकारच्या विश्‍वासदर्शक ठरावाच्यावेळी सभागृहातून गेले, त्यामुळे ते पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरत असल्याचा मुद्दा कॉंग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार व चौदाही आमदारांच्या सहीने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केले आहे. राणे यांच्या या कृतीमुळे पक्षांतरबंदी कायद्याचा हेतूच नष्ट झाल्याचा कॉंग्रेसचा दावा आहे.