विरोध मोडीत काढून प्रकल्प मार्गी लावा

0
107

>> संरक्षणमंत्री पर्रीकरांचे आवाहन : पेडणे बसस्थानकाचा शुभारंभ

 

भाजपने पेडणेकरांना अनेक प्रकल्प दिले आहेत. यामध्ये पेडणे बसस्थानक हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. याबरोबरच मोपा विमानतळ, आयटीसीटी आदी प्रकल्प होऊ घातले आहेत. या प्रकल्पांमुळे येथे अनेक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र, काहीजण मोपा विमानतळाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, विरोध मोडीत काढून प्रकल्प मार्गी लावा, असे आवाहन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
पेडणे बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर, नगराध्यक्ष स्मिता कुडतरकर, साधनसुविधा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रंजीत रॉड्रिक्स, जिल्हा सदस्य रमेश सावळ, अरुण बानकर, संचालक र्डरिक परेरा, सुनील मसुरकर, रमेश शषट मांद्रेकर आदी उपस्थित होते.
एकूण २५ कोटी रुपये खर्चून हे सुसज्ज असे बसस्थानक उभारलेले आहे. एकूण ८ प्रवासी बसेस थांबण्याची आणि दुरुस्तीची सोय, ६० चारचाकी वाहने व १०० दुचाकी वाहनांची पार्किंग सोय आणि १९ लहान दुकाने तर १८ मोठी दुकाने या बसस्थानक प्रकल्पात आहेत.
३ वर्षात विमान उतरणार
यावेळी बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोपा विमानतळावर तीन वर्षात विमान उतरणार असून या प्रकल्पामुळे ८ ते १० हजार नोकर्‍या उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे बावटे
यावेळी कूळ-मुंडकार संघटनेतर्फे उमेश तळावणेकर यांच्या नेतृत्वाखाली काही नागरिकांनी संरक्षणमंत्री पर्रीकर आणि मुख्यमंत्री पार्सेकर यांनी काळे बावटे दाखवण्याचा प्रयत्न केले. मात्र, पोलीस निरीक्षक संजीव दळवी यांनी आंदोलनकर्त्यांना वेळीच आवरले.
सरकारला ३७ टक्के महसूल
मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बोलताना सांगितले की, कहीजण सरकरचा विरोध करीत आहेत. सरकारचा अपप्रचार करून सरकारविरोधी वातावरण तयार करीत आहेत. मात्र, पेडणेकरांना सर्व काही माहीत आहे. भाजपने पेडणे तालुक्यात अनेक मोठे प्रकल्प आणले आहेत. यातील मोपा विमानतळामुळे सरकारला ३७ टक्के महसूल मिळणार आहे. याचा फायदा विकासकामे करण्यासाठी होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.