विरोधी पक्षनेत्यांचे मुख्यमंत्र्यांना चर्चेचे आव्हान

0
6

राज्यातील वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, पर्यावरणाचा ऱ्हास, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था व कोलमडलेली अर्थव्यवस्था यावर चर्चा व वादविवादासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यांना दिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिल्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकार गोव्याच्या अस्मितेचे रक्षण करण्यास अपयशी ठरल्याचा आरोप केला. वाढत्या बेरोजगारीवर चर्चा करण्याचे धाडस मुख्यमंत्र्यांनी करावे, असेही ते म्हणाले.