गोवा विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कॉंग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांची काल नियुक्ती करण्यात आली. सभापती रमेश तवडकर यांनी आलेमाव यांच्या नावाला मान्यता दिली. सध्या गोवा विधानसभेत कॉंग्रेसचे केवळ ३ आमदार आहेत.
कॉंग्रेसच्या ११ आमदारांपैकी ८ आमदारांनी वेगळा गट स्थापन करून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कॉंग्रेसमध्ये उरलेल्या तिघांमध्ये युरी आलेमाव यांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे विधिमंडळ गटनेते म्हणून आलेमाव यांची पक्षाकडून निवड झाली होती.