विमान प्रवासात आता मास्क सक्ती नाही

0
11

कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवासावेळी मास्क सक्ती हटवली आहे. बुधवारी केंद्र सराकरने नियमावली जारी केली. त्यात विमान प्रवासात मास्क वापरणे अनिवार्य नाही; असे म्हटले आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बुधवारी विमान प्रवासातील कोरोना नियमाची चाचपणी करत नियमांत बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, आता विमान प्रवास करताना मास्क सक्ती नसेल; पण मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबत मास्क न वापरणार्‍याकडून आकारण्यात येणार्‍या दंडाचा नियमही मागे घेण्यात आला आहे.