विनेश फोगाटला कोरोना

0
91

भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला कोरोनाची बाधा झाली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या रंगीत तालमीपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा विजेत्या विनेशने सांगितले आहे.

मी घरी अलगीकरणात राहणार असून लवकरात लवकर पूर्ण तंदुरुस्त होण्याचा विश्‍वास विनेशने व्यक्त केला आहे. कोरोना बाधित असल्यामुळे विनेशला आज होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराच्या व्हर्च्युअल सोहळ्याला उपस्थित राहता येणार नाही.