विधानसभा निवडणुकांत शेतकरी भाजपविरोधात प्रचार करणार

0
143

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या भारतीय किसान युनियनने काल झालेल्या बैटकीत भाजपविरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला. आगामी काळात विविध राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या त्या राज्यांत शेतकर्‍यांचे एक पथक जाऊन भाजपचा पराभव करण्याचे आवाहन करणार आहे.

भारतीय किसान युनियनचे नेते बलबीरसिंह राजेवाल यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, भारतीय किसान युनियन पश्चिम बंगाल आणि केरळ विधानसभा निवडणुकीत आपले पथक पाठवेल. ते पथक तेथील लोकांना भाजप उमेदवाराला हरवण्यासाठी आवाहन करेल. मात्र यावेळी पथक कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थन करणार नाही, पण भाजपाला हरवू शकतील अशा उमेदवारांना मतदान करण्याचे मतदरांना आवाहन करेल. नागरिकांना ते पथक शेतकर्‍यांबद्दल मोदी सरकारच्या असलेल्या धोरणाची माहिती देईल असेही राजेवाल म्हणाले.

यावेळी उपस्थित असलेले स्वराज भारतचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी, संयुक्त किसान मोर्चाच्या काल झालेल्या बैठकीत आम्ही १५ मार्चपर्यंत होणार्‍या कार्यक्रमांना अंतिम रूप दिले असल्याचे सांगितले. येत्या ६ मार्च रोजी आंदोलन १०० व्या दिवसांत प्रवेश करणार आहे.