म्हादईप्रश्‍नी कळसा-भंडुरा नाल्याची येत्या चार आठवड्यांत संयुक्त पहाणी

0
118

म्हादईप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या चार आठवड्यात कळसा-भंडुरा नाल्याची संयुक्तपणे पाहणी होणार आहे. त्यासाठीच्या पॅनलवर गोवा सरकारने यापूर्वीच अभियंत्यांची नियुक्ती केली आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

चार आठवड्यांच्या आत ही संयुक्त पाहणी होणार असून पाहणीचा अहवाल आपणाला देण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या पाहणीनंतर कळसा-भंडुरा नाल्याजवळील खरी माहिती सर्वोच्च न्यायालयासमोर येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक सरकारने कळसा-भंडुरा नाल्याद्वारे गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईचे पाणी पळवले असून त्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात खटला चालू आहे. त्यावरील सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कळसा-भंडुरा नाल्याशी संयुक्तपणे पाहणी करून आपणाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. वरील पाहणी ही चार आठवड्यांच्या आत केली जावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.