विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री साधणार संवाद

0
130

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत येत्या ६ ऑगस्ट २०२० रोजी संध्याकाळी ६ ते ७ यावेळेत गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावी आणि बारावीची परीक्षा पूर्ण केलेल्या सुमारे १ हजार विद्यार्थ्यांशी ऑनलाइन पद्धतीने संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी संवाद साधण्यासाठी राज्यातील प्रत्येक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या दोन विद्यार्थ्यांना नियुक्त करावे, असे शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. एक हजार विद्याथ्यार्र्ंशी वेबॅक्स ऍपच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे. विद्यार्थी आपल्या घरातून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधू शकतात.

संगणक शिक्षकांनी मुलांना संवाद साधण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे. विद्यालयांनी संवाद साधण्यासाठी नियुक्त केलेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती मंगळवारी दुपारपर्यंत शिक्षण खात्याला सादर करावी. या संवादाच्या दिवशी शाळांना संवाद साधण्यासंबंधीची लिंक पाठविली जाणार आहे, असेही परिपत्रकात म्हटले आहे.