राज्यात १.६७ इंच पाऊस

0
172

राज्यात चोवीस तासांत सर्वच भागात जोरदार वार्‍यासह पावसाने हजेरी लावली असून राज्यभरात १.६७ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात पावसाची रिपरिप सुरू झाली असून येत्या ५ ऑगस्टपर्यंत पावसाचे प्रमाण जास्त राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

राज्यात सांगे वगळता इतर भागात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ९३.५९ इंच पावसाची नोंद झाली आहे. मुरगाव येथे सर्वाधिक २.९२ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे २.६३ इंच, वाळपई येथे २.५८ इंच, ओल्ड गोवा येथे २.४४ इंच, म्हापसा येथे २.४० इंच, केपे येथे २.१७ इंच, फोंडा येथे १.८० इंच, पणजी येथे १.८० इंच, साखळी येथे १.६६ इंच, काणकोण येथे १.०३ इंच, दाभोळी येथे १.३६ इंच, मडगाव येथे १.३६ इंच पावसाची नोंद झाली आहे.