>> मेडिकल कॉलेजप्रश्नी विश्वजित राणे
दक्षिण गोव्यातील नियोजन पीपीपी तत्त्वावरील खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रश्नावरून आरोग्य मंत्री विश्वजित राणे आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे.
विजय सरदेसाई यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेबाबत विविध प्रश्न उपस्थित करून आरोग्य मंत्री राणे यांनी स्पष्टीकरण करण्याची मागणी केली आहे. तर, विजय सरदेसाई हे विरोधी पक्षात असल्याने खासगी महाविद्यालयाला विरोध करीत असल्याचा आरोप आरोग्य मंत्री राणे यांनी केला आहे.
विजय सरदेसाई हे सरकारमध्ये असताना त्यांच्यासमोर खासगी वैद्यकीय महाविद्यालयाचा विषय उपस्थित केला होता. त्यावेळी सरदेसाई हे गप्प बसले होते. आता, विरोधी पक्षात असल्याने टिका करू लागले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार खासगी महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. खासगी महाविद्यालयाच्या प्रश्नावर विधानसभेत चर्चा करण्याची तयारी आहे, असा दावा आरोग्य मंत्री राणे यांनी केला.
राजकारणात काम करण्यासाठी विजय सरदेसाई यांच्या सल्ल्याची गरज नाही. विजय सरदेसाई आणि त्याच्या पक्षाच्या इतर दोन आमदारांनी सत्तेत असताना किती जणांना रोजगार मिळवून दिला. आता, विरोधी पक्षात असल्याने युवक दिसू लागले आहेत. त्यामुळे युवकांच्या नोकर्यांचा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत, अशी टिका मंत्री राणे यांनी केली.
उद्योग खात्याची सुमारे २४ लाख चौरस मीटर जमिनीचा लिलाव करून तेथे नवीन रोजगार देणारे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.