गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांनी राज्य सरकारच्या पर्यटन खात्याच्या जेटी धोरण मसुदा २०२२ ला विरोध करणारे निवेदन काल सादर केले. राज्यातील सर्व जेटी आणि जहाज यांचे व्यवस्थापन बंदर कप्तान खात्याच्या अखत्यारित पाहिजेत, पर्यटन खात्याच्या अखत्यारित नव्हे, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.