विकास, गौरवचे पदक पक्के

0
114

आशियाई क्रीडा स्पर्धेचा माजी विजेता विकास कृष्णन (७५ किलो) व नवख्या गौरव सोळंकी (५२ किलो) यांनी काल शुक्रवारी ६९व्या स्ट्रँडजा मेमोरियल बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत आपले पदक निश्‍चित केले.
गौरवने किर्गिस्तानच्या असत उसेनालिव याला तुडविले तर विकासने कझाकस्तानच्या तुर्सानिबे कुलाखमेत याला पाणी पाजले. हाताच्या दुखापतीमुळे विकासला राष्ट्रीय अजिंक्यपद तसेच इंडिया ओपनला मुकावे लागले होते. परंतु, झोकात पुनरागमन करत त्याने पुनरागमनाच्या पहिल्याच स्पर्धेत भारताचे पदक निश्‍चित केले. आत्तापर्यंत चार पुरुष बॉक्सिंगपटूंनी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. अमित फंगल (४९ किलो) व हुसामुद्दिन (५६ किलो) हे उर्वरित दोघे आहेत. महिलांमध्ये मेरीकोम (४८ किलो), सरिता(६० किलो), सीमा (८१ किलोंवरील), स्विटी (७५ किलो), मीना (५४ किलो) व भाग्यवती (८१ किलो) यांनी यापूर्वीच पदके पक्की केली आहेत.