विकलांगांना उपकरणांसाठी मदतीची योजना अधिसूचित

0
108

दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत विकलांगांना व्हिलचेअर, ऐकू येण्याचे यंत्र यासारखी उपकरणे खरेदी करण्यासाठी मदत देण्याची योजना सरकारने नुकतीच अधिसूचित केली असून संबंधितांना त्याचा लाभ घेता येईल. त्यासाठी त्यांना समाज कल्याण खात्याकडे अर्ज करावे लागतील.दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखाली आर्थिक सहाय्य मिळणार्‍या वरील वर्गातील लाभार्थींसाठी ही खास योजना सुरू केली आहे. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने वरील योजना तयार करण्याचे जाहीर केले होते. दि. ४ रोजी खात्याने अधिसूचना जारी करून योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.
सध्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थींची संख्या १ लाख ३३ हजार ८५३ वर पोचली आहे. दरमहा अर्जांची छाननी करून मंजुरी दिली जात असल्याने अर्जांवर लवकर प्रक्रिया होते, असे सहाय्यक संचालकांनी सांगितले. या योजनांवर जीईएलचे नियंत्रण असल्याने गृह आधार योजनेचा लाभ घेणार्‍यांना जीएसएस योजनेचा लाभ दिला जात नाही. यामुळे काहीजण या योजनेबरोबरच अन्य योजनांचाही लाभ घेत होते. आता या प्रकारांवर नियंत्रण आल्याचे सांगण्यात आले.