Home बातम्या वाहन नोंदणीबाबतमहत्त्वाचा आदेश जारी

वाहन नोंदणीबाबतमहत्त्वाचा आदेश जारी

0

राज्यात वाहतूक वाहनांची नोंदणी करण्यासाठी यापुढे लीव्ह अँड लायसेन्स, आधार कार्ड स्वीकारू नये, असा निर्देश वाहतूक खात्याचे संचालक प्रविमल अभिषेक यांनी काल जारी केला. खासगी बस मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांना या प्रकरणातून म्हापसा येथील बसस्थानकावर मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. परराज्यातील खासही बसगाड्यांची लीव्ह अँड लायसेन्स, आधार कार्ड यांच्या आधारे गोव्यात नोंदणी केली जात असल्याने स्थानिक बसमालकांवर अन्याय होत आहे. तसेच महसूल बुडत आहे, अशी तक्रार सुदिन ताम्हणकर यांनी केली होती. ताम्हणकर यांना मारहाण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन वाहतूक खात्याला वाहन नोंदणीसाठी लीव्ह अँड लायसेन्स, आधार कार्ड स्वीकारू नये, असे निर्देश दिले होते.