वाहन कर वसुलीसाठी डॉम्निक डिसोझाला नोटीस

0
26

शिवोली येथील बिलिव्हर्स चर्चच्या डॉम्निक डिसोझा याला आलिशान मर्सिडीज कार खरेदीवर दिलेल्या करसवलतीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रद्द केलेली ही रक्कम वसूल का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस वाहतूक खात्याने डॉम्निक डिसोझाला बजावली आहे.

म्हापसा पोलिसांनी कथित धर्मांतर प्रकरणी शिवोली येथील बिलिव्हर्स चर्चच्या डॉमनिक डिसोझा याला अटक केल्यानंतर त्याने खरेदी केलेल्या अलिशान मर्सिडीज कारसाठी २०१४ मध्ये दिलेल्या कर सवलतीचे प्रकरण उघडीस आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर रक्कम वसूल करण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर वाहतूक खात्याने मर्सिडीज कार खरेदीवर दिलेली कर सूट रद्द करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. या प्रकरणी कायदा खात्याकडून सल्ला घेण्यात आला असून, कायदा खात्याने २०१४ मधील कर सवलत देणारी अधिसूचना मागे घेण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, वाहतूक संचालकांसमोर सदर कारणे दाखवा नोटीसवर काल सुनावणी घेण्यात आली.