वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची खात्याकडून सोय!

0
94

दंड भरण्याची मडगावातही सुविधा
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांना देण्यात येणारी चलने भरण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दक्षिण गोव्यातील मडगांव येथील नोटीस ब्रँचमध्ये व्यवस्था केली आहे. त्यामुळे वरील चालकांना दंड भरण्यासाठी पणजी शहरात येण्याची गरज भासणार नाही, असे वाहतूक पोलीस अधिक्षकांनी सांगितले.वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी राज्याच्या विविध भागात सीसी टव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांची छायाचित्रे वरील कॅमेर्‍यांमध्ये टिपल्यानंतर संबंधितांना वाहतूक पोलीस दंडात्मक कारवाईसाठी नोटिसा पाठवून देतात. अशा चालकांना दंड भरण्यासाठी पणजीतील मुख्यालयात यावे लागत होते. नोटीसा पाठविल्यानंतर ३० दिवसांच्या आत दंड न भरल्यास प्रकरण न्यायालयात पाठविण्याची पध्दत होती. आता सात दिवसांच्या आत नोटिस ब्रँचमध्ये येऊन वाहन चालकांना दंड भरण्यासाठी संपर्क करावा लागेल, असे अधिक्षकांनी सांगितले.