केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील वाहतूक नियमभंगासाठीच्या दंडाच्या रकमेत कोणतीही कपात न करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोवा मंत्रिमंडळाच्या आज बुधवारच्या बैठकीत नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीसंबंधी प्रस्ताव सादर केला जाणार आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर बोलताना काल दिली.
मंत्री गडकरी यांनी नवीन मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी व इतर विषयांवर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विविध राज्यांच्या वाहतूकमंत्र्यांशी चर्चा केली.
केंद्रीय वाहतूक मंत्री गडकरींसमोर नवीन मोटर वाहन कायद्याच्या अंमलबजावणीच्या विषयावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी नियमभंगाच्या रकमेत कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे सांगितले. असे गुदिन्हो म्हणाले.
राज्यात नवीन मोटर वाहन कायदा लागू करणे ही आपली जबाबदारी आहे. यापूर्वीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन मोटर वाहन कायद्याचा प्रस्ताव मांडला होता. आता पुन्हा एकदा कायद्याच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे गुदिन्हो म्हणाले.