वास्को आरसीसी अंतिम फेरीत

0
75

फोंडा आरसीसीचा १९१ धावांनी पराभव करून वास्को आरसीसीने अंडर-१९ इंटर आरसीसी सौरभ सरदेसाई क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. वास्को वॉरियर्स क्रिकेट अकादमीने चिखली येथील साग मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत वास्को आरसीसीने प्रथम फलंदाजीत निर्धारित ४५ षटकात ८ बाद २८५ धावा केल्या. सामनावीर सचिन मिश्राने नाबाद ५९ धावा ठोकल्या. प्रत्युत्तरात फोंडा आरसीसीचा डाव अवघ्या ६७ धावांवर आटोपला.

संक्षिप्त धावफलक
वास्को आरसीसी ४५ षटकात ८ बाद २८५ (सचिन मिश्रा नाबाद ५९, कृष्णा ठाकूर ४८, कृष्णन उन्नी ३४, मारुती हुग्गी २९, योगेश नाईक २६, सुनिल लमाणी नाबाद २४ धावा, सोमेश प्रभुदेसाई ३-१७, शुभम बांदोडकर ३-३३ बळी) वि. वि. फोंडा आरसीसी १९.४ षटकात सर्वबाद ६७ (रोहित धारेश्‍वर २७, मयूर तिळवे १२ धावा, धीरज यादव ५-२२, कृष्णा ठाकूर २-८, सचिन मिश्रा २-१६
बळी).