वास्कोत दोन गटातील मारहाणीत दोघे गंभीर

0
84

मांगोर हिल वास्को येथील गुरुद्वारानजीक काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास दोन गटात सशस्त्र मारामारी प्रकरणी दोन्ही गटातील आठ जणांना वास्को पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंजू मदार व दुर्गेश मदार यांच्या बहिणीची विरोधी गटातील लोकांनी छेड काढल्यावरून हे मारामारीचे प्रकरण घडले. यात दुर्गेश व मंजू यांनी मोलानी हबीब शेख व अब्दुल रेहमान यांना चाकूने भोसकले. त्या दोघांतही बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. पुढील तपास वास्को पोलीस करीत आहेत. अटक केलेल्यांच्या नातेवाईकांनी पोलिस स्थानकासमोर गर्दी केली होती.