वाळपई पालिकेवर विश्वजित राणेंचे वर्चस्व

0
139

वाळपई पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे वर्चस्व दिसून आले. नऊपैकी आठ जागांवर विश्वजित राणे समर्थकांनी विजय मिळवला, तर यापूर्वी एक नगरसेविका बिनविरोध निवडून आली होती.

अपक्ष उमेदवाराचा विश्वजित यांना पाठिंबा
वाळपई पालिका निवडणुकीत विश्वजित यांच्या गटाच्या विरोधात सर्वपक्षीय उमेदवार म्हणून विनोद हळदणकर रिंगणात उतरले होते. विश्वजित राणे समर्थक उमेदवार उमेश गुळेलकर यांचा पराभव करण्यासाठी त्या ठिकाणी दुसरा उमेदवार उतरणार नाही याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे हळदणकर यांचा विजय झाला, पण निवडून येताच विनोद हळदणकर यांनी विश्वजित राणे यांना पाठिंबा दिला.