वायनाडमधून राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

0
23

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल बुधवारी केरळमधील वायनाड मतदारसंघातून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी त्यांनी बहीण प्रियंका गांधी यांच्यासोबत रोड शो केला. इंडिया आघाडीचा भाग असलेल्या सीपीआयच्या नी राजा वायनाडमधून राहुल यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. नी राजा यांनीही बुधवारी रोड शो करून उमेदवारी दाखल केली. त्याचवेळी भाजपने राहुल यांच्याविरोधात के. सुरेंद्रन यांना मैदानात उतरवले आहे. यासोबतच काँग्रेस पक्षाचे ‘पाच न्याय, पंचवीस गॅरंटी’ देशातील जनतेपर्यंत नेण्यासाठी काँग्रेसने ‘घर घर गॅरंटी’ अभियान सुरू केले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याची सुरुवात ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातून केली. किमान 8 कोटी घरांमध्ये गॅरंटी कार्ड पोहोचवण्याची पक्षाची योजना आहे.