सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या कामगार बळ सर्व्हेच्या ताज्या अहवालानुसार गोव्यातील बेरोजगारीचा दर हा 8.3 टक्के इतका असल्याचे स्पष्ट झाले असून, तो राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूपच जास्त असल्याचे दिसून आले आहे, असे काँग्रेसने म्हटले असून ही केवळ आकडेवारी नाही तर राज्यातील युवकांसाठी रोजगार निर्माण करण्यात आलेल्या अपयश असल्याचा पुरावा आहे, असे गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रसारमाध्यम प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी म्हटले आहे. राज्यातील सुशिक्षित व पात्र उमेदवारांना नोकऱ्या मिळत नाहीत. परिणामी कुटुंबांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण होत आहे. भाजप सरकार लोकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोपही त्यांनी केला.