वाघेरी येथील डोंगरप्रकरणी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या वन परिक्षेत्र अधिकार्याला (आरएफओ) निलंबित करण्यात येणार असून, तेथील तत्कालीन उप वन संरक्षकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी काल स्पष्ट केले.
या प्रकरणी वाघेरी येथे कर्तव्यावर असलेल्या वन परिक्षेत्र अधिकार्याला निलंबित केले जावे, अशी सूचना आपण विशेष मुख्य वन संरक्षकांना केली आहे, असेही राणे यांनी सांगितले.
तत्कालीन उप वन संरक्षकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही, तर त्यांनाही निलंबित करण्यात येणार असल्याचे राणेंनी सांगितले. बेकायदा प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.