राज्यात वनहक्क कायद्याखाली नागरिकांचे जमिनीचे दावे निकालात काढण्याचे काम सुरू असून दावे निकालात काढण्याच्या कामाला आणखी गती दिली जाणार आहे. वनहक्क कायद्याखाली दावे निकालात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ घेतली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. प्रसाद गावकर, दिगंबर कामत यांच्या लक्षवेधी सूचनेवर ते बोलत होते.
वनहक्क कायद्याखाली सुमारे १० हजार दावे दाखल केले असून ते प्रलंबित आहेत. असे गावकर यांनी सांगितले.
सत्तरी तालुक्यात आत्तापर्यंत २१ जणांना सनद देण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.