वडिलांवर गोळी झाडणार्‍या मुलाला काकोडा येथे अटक

0
118

सुकेकर्णा, केपे येथील विष्णू गावकर (५५) याला त्याच्याच मुलाने देशी बनावटीच्या बंदुकीने गोळी झाडून गंभीर जखमी केल्याप्रकरणी पोलिसांनी अच्युत गावकर (३८) याला काल काकोडा येथे अटक केली. त्याला काल न्यायालयात उभे केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी मध्यरात्री १ च्या दरम्यान अज्ञाताने विष्णू घरात असताना बंदुकीने गोळी झाडली. ती त्याच्या शरीराच्या उजव्या बाजूला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला मडगाव येथील हॉस्पिसियु इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलीस चौकशीदरम्यान त्याच्या पत्नीने मुलगा अच्युतने गोळी झाडल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर त्याला काकोडा येथे जाऊन अटक करण्यात आली.