वंदे भारत स्लीपर रेल्वे तीन महिन्यांत सुरू

0
7

>> केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

>> बेंगळुरू येथे स्लीपर ट्रेनची पाहणी

केंद्रिय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल रविवारी 1 सप्टेंबर रोजी वंदे भारत स्लीपर रेलगाडीच्या पहिल्या नमुन्याची झलक पाहिली. ते बेंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या कारखान्यात ट्रेनची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी, वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या 3 महिन्यांत सुरू होईल. कोचच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. तो काही दिवसांत बीईएमएल कारखान्यातून बाहेर येईल. पुढील 2 महिने ट्रेनची चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

रेल्वेमंत्रा वैष्णव यांनी, वंदे भारत स्लीपर ट्रेन 800 ते 1200 किमी अंतर प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. रात्री 10च्या सुमारास प्रवासी त्यात चढतील आणि सकाळी त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील. ही ट्रेन मध्यमवर्गीयांसाठी बनवण्यात आली आहे. त्याचे भाडे राजधानीइतकेच असेल अशी माहिती दिली. वंदे भारत स्लीपर ट्रेनला 16 डबे आहेत.

रेल्वेमंत्री वैष्णव यांनी वंदे भारत दोन डब्यांना जोडणाऱ्या कपलरचे नवीन तंत्रज्ञान आणले आहे. त्यामुळे ट्रेनचे वजन कमी होते आणि तिची ताकद वाढते अशी माहिती दिली. डबे आणि स्वच्छतागृहांची सुधारणा करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स आहेत. डिझाइनमध्येही अनेक शोध लावले आहेत. देखभाल कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन असून या ट्रेनची जगातील सर्वोत्तम ट्रेनशी तुलना करता येईल अशी माहिती श्री. वैष्णव यांनी दिली.

वंदे भारतची वैशिष्ट्ये

वंदे भारत स्लीपरचा वेग ताशी 160 किमी असेल. प्रवास आरामदायक व्हावा अशा पद्धतीने बर्थ आणि बोगींची रचना केलेली आहे. ट्रेनच्या आतमधील दृश्य बघितले, तर प्रवाशांना विमान प्रवासाचीच अनुभूती प्रवास करताना येणार आहे. वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसला एकूण 16 डबे असतील. प्रोटोटाईप मॉडेलमध्ये 11 एससी 3 टिअर कोच, 4 एससी 2 टिअर कोच आणि एक एससी फर्स्ट क्लास कोच असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रेनमध्ये एससी 611 थर्ड एससी सीट्स असणार आहे. तर 188 सेंकड एससी आणि 24 फर्स्ट क्लास एससी सीट्स असतील. वंदे भारत स्लीपर ट्रेन जागतिक दर्जाचे बनवण्यात आले आहे. युरोपीय मानकांनुसार ही ट्रेन बनवण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये जीएफआरपी पॅनल, बाहेरचे दरवाजे ऑटोमॅटिक, तर आतील दरवाजे सेन्सर आधारित आहेत. वंदे भारत स्लीपर ट्रेनची वैशिष्ट्‌‍ये प्रवास आरामदायक व्हावा, यासाठी ट्रेनमध्ये वाचन करण्यासाठी लाईट आहे. त्याचबरोबर युएसबी चार्जिंग पॉईंट आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष बर्थ आणि टॉयलेटही आहे.