>> आयआयटी मुंबई व दिल्लीच्या अहवालात कारणमीमांसा; विधानसभेत सादर
कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळून पडण्याची जी दुर्घटना घडली होती, त्या प्रकरणी आयआयटी मुंंबई व आयआयटी दिल्लीने गोव्यात येऊन तपासणी करून सादर केलेला अहवाल काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहाच्या पटलावर ठेवला.
ही इमारत 43 वर्षे एवढी जुनी असून, या रंगमंच्याच्या छताच्या काँक्रिटला जे लोखंड वापरले होते, ते गंजून गेले होते. परिणामी छताचा खांब मोडल्याने ते कोसळले, असा अहवाल आयआयटी मुंबई व दिल्लीने दिला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.