>> उच्च न्यायालयाचा आदेश
गोव्यातील रिक्त झालेले ‘लोकायुक्त’ पद येत्या तीन महिन्यात भरण्यात यावे, असा आदेश काल मुंबइं उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला. न्यायमूर्ती एम. एस. सोनक व न्यायमूर्ती एम. एस. जवाळकर या दोन सदस्यीय खंडपीठाने काल हा आदेश दिला.
लोकायुक्त पी. के. मिश्रा हे १७ सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर हे पद लवकरात लवकर भरले जावे यासाठी तसेच नव्या आयुक्तांची निवड करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया सरकारने विनाविलंब सुरू करावी या मागणीसाठी ऍड्. आयरिश रॉडिग्ज यांनी न्यायालयात धाव घेतली होती. यासंबंधीची सुनावणी न्यायालयात चालू असताना गेल्या १७ सप्टेंबर रोजी लोकायुक्त पी. के. मिश्रा हे निवृत्त झाले.
या पार्श्वभूमीर काल आदेश देताना खंडपीठाने लोकायुक्त हे महत्त्वाचे पद लवकरात लवकर भरण्याची गरज असून सरकारने ते विनाविलंब भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू करावी, असा बुधवारी आदेश दिला.