लॉकडाऊन वाढविण्याची बहुतेक मंत्र्यांची सूचना

0
152

>> मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी ऐकल्या मंत्र्यांच्या सूचना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन येत्या ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्याची सूचना बहुतांश मंत्र्यांनी काल केली. तसेच राज्याच्या बंद करण्यात आलेल्या सीमा खुल्या करू नये संचारबंदीचा आदेश आणखी काही महिने कायम ठेवण्याची सूचना मंत्र्यांनी केली.

लॉकडाऊननंतरच्या वाटचालीवर विचारविनिमय करण्यासाठी खास मंत्रिमंडळाची बैठक काल घेण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सर्व मंत्र्यांकडून सूचना जाणून घेतल्या.

सावंत यांनी कोविड १९ अंतर्गत जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मोकळीक देण्यात आली आहे. राज्यात कोरोना विषाणूचे संकट टळेपर्यंत १४४ कलम लागू ठेवण्याची गरज आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

पंतप्रधान मोदी यांनी देशातील लॉकडाऊन मागे घेण्याची घोषणा केली तर त्यानंतर राज्यातील पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी विमानतळ, रेल्वे स्थानक व इतर ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी अद्ययावत  साधन सुविधा उपलब्ध  करण्याची गरज आहे, असे बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.

परराज्यातून भाजीपाला आणला जात आहे. एकाही व्यक्तीला बाहेर जाण्यास मान्यता दिली जात नाही. केंद्राच्या सूचनेनुसार परराज्यातील कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाऊ दिले जाऊ शकते, असे लोबो यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जनतेच्या हितार्थ निर्णय घेण्याची मोकळीक देण्याची गरज आहे. गोवा सरकारने लॉकडाऊनबाबत सूचना सादर करायला हव्यात. राज्यातील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविल्यानंतर पुढे आणखी सहा महिने सोशल डिस्टन्सचे पालन करण्याची गरज आहे, असे मंत्री मायकल लोबो यांनी सांगितले.