लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन, दिल्लीत तीन शेतकरी अटकेत

0
108

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणार्‍या वायुसेना भवनजवळ दिल्ली पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन शेतकर्‍यांना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याने अटक केली. हे तिन्ही शेतकरी ओपन जिप्सीमधून जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. चौकशीनंतर लॉकडाऊनच्या उल्लंघनाच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल त्यांना अटक केली व नंतर जामिनावर सोडण्यात आले. शेतकरी बंगला साहिब गुरुद्वारा येथे थांबले होते. त्यानंतर ते वायुसेनेच्या इमारतीजवळून जात होते. ते सिंधू सीमेच्या दिशेने जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु पोलिसांनी त्यांना अडवून विविध कलमांतर्गत अटक केली.