बाजिंदर सिंगला लैंगिक छळ प्रकरणात मोहाली न्यायालयाने दोषी ठरवले असून, जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मोहाली न्यायालयाने काल हा निर्णय दिला. गेल्या आठवड्यात या प्रकरणावर सुनावणी पार पडली होती, तेव्हा बाजिंदर सिंगला 2018 च्या झिरकपूर लैंगिक छळ प्रकरणात दोषी ठरवले होते; मात्र शिक्षेचा निर्णय राखून ठेवला होता. यानंतर न्यायालयाने काल निर्णय देत बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
एका महिलेने 2018 मध्ये मोहालीच्या झिरकपूर पोलीस ठाण्यात बाजिंदर सिंगविरोधात तक्रार दाखल केली होती. पीडितेने फिर्यादीत म्हटले होते की, बाजिंदर सिंगने तिला परदेशात नेण्याचे आश्वासन देऊन तिचे शोषण केले. तसेच घटनेचा व्हिडीओ बनवून इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तिने तक्रारीत म्हटले होते. यानंतर 2018 मध्ये पीडितेने पोलिसांत बाजिंदर सिंगविरोधात लैंगिक छळ केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणातील पीडितेच्या वकिलांनी म्हटले की, न्यायालयाने बाजिंदर सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आता त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. फाशीनंतरची ही सर्वात मोठी शिक्षा आहे.