Home Featured लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

लुथरा बंधूंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी

0

गेल्या डिसेंबर महिन्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबचे मालक असलेल्या लुथरा बंधूंनी जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी काल म्हापसा न्यायालयाने उद्या 12 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यासंबंधीचा निवाडा तयार नसल्याने न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आता हा निवाडा उद्या 12 रोजी देण्यात येणार आहे.
या नाईट क्लबच्या परवान्यासंबंधी लुथरा बंधूंनी जी फसवेगिरी केलेली आहे त्यासंबंधीच्या अटकपूर्व जामिनाविषयीची सुनावणी न्यायालयाने 18 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.

हडफडे सरपंचांचाही
जामिनासाठी अर्ज

वरील प्रकरणी कैदेत असलेले हडफडे पंचायतीचे अपात्र सरपंच रोशन रेडकर यांनीही जामिनासाठी अर्ज केलेला असून या अर्जावर म्हापसा न्यायालयात 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
दरम्यान, हडफडे येथील मृतांना दिल्ली सरकारकडून ‘बर्च बाय रोमिया लेन’ या नाईट क्लबला लागलेल्या आगीत होरपळून ठार झालेल्या दिल्लीतील विनोद कुमार (42), अनिता जोशी (42), सरोज जोशी (41) व कमला जोशी (44) या मृतांच्या कुटुंबियांना दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी प्रत्येकी 10 लाख रु.ची नुकसानभरपाई दिली. गेल्या 6 डिसेंबर 2025 रोजी वरील नाईट क्लबला लागलेल्या आगीत जे 25 जण ठार झाले होते त्यात दिल्लीस्थित वरील चारजणांचा समावेश होता. वरील चार मृत व्यक्ती ह्या एकाच कुटुंबातील होत्या. ह्या मृत व्यक्ती दिल्लीतील सदनपूर येथील होत.