लाल बत्ती वापराचा अधिकार काहींनाच

0
74

वाहनावर लाल दिवा वापरण्यासाठी काही पदे अधिसूचित केलेली आहेत. अधिसूचित न केलेल्या पदांवरील व्यक्तींना तो वापरण्याचा अधिकार नाही, असे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी सांगितले. दक्षिण गोव्याचे खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर आपल्या वाहनावर लाल दिवा वापरीत असल्याची तोंडी तक्रार ऍड्. आयरीश रॉड्रिग्स यांनी आपल्याकडे केली आहे. फोंडा येथील वाहतूक अधिकारी वरील प्रकाराची दखल घेत नसल्याचे रॉड्रिग्स यांचे म्हणणे आहे. वरील प्रकार खरा असल्यास कारवाई केली जाईल, असे देसाई यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.