लाला की बस्तीतून 96 जणांना अटक

0
10

वाढत्या चोऱ्या अन्‌‍ गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कोलवाळ पोलिसांनी गुरुवारी माडेल थिवी येथील लाला की बस्ती या परिसरात सकाळच्या सत्रात भाडेकरू पडताळणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान सुमारे 97 लोकांची तपासणी केली गेली. त्यातील 96 जणांकडे (पुरुष) आवश्यक कागदपत्रे नव्हती. त्यामुळे वरील लोकांना 41 सीआरपीसी अंतर्गत अटक करण्यात आली. एखाद्या व्यक्तीस घरमालकांनी भाडेकरू म्हणून ठेवल्यास त्यांची अधिकृत कागदपत्रे पोलिस स्थानकात जमा करायची असतात. मात्र, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याने पोलिसांनी ही कारवाई राबविली. पोलिस निरीक्षक विजय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.