लाडफे डिचोली येथे काल बुधवारी रात्री पावणे आठच्या सुमारास दुचाकी व टम्पो यांची समोरासमोर टक्कर होऊन अपघात घडला. या अपघातात मोटरसायकल चालक श्रीनिवास यल्लाप्पा कलुटी (34) आयडीसी डिचोली, मूळ कर्नाटक याचा मृत्यू झाला. डिचोली पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.