लाठीमाराच्या निषेधार्थ ‘आप’ची भव्य रॅली

0
88

रापणकारांवर काल पणजी येथे पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ विद्यमान सरकार व पोलिसांच्या विरोधात ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळी बांबोळी ते पणजीपर्यंत भव्य रॅली काढवा. या रॅल्लीचे नेतृत्व आपच्या केंद्रीय युवा नेत्या तथा अभिनेत्री गुल पनाग यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.

काल संध्याकाळी बांबोळी येथे ‘आप’चे समर्थक व युवा नेते मोठ्या संख्येने जमले होते. यात गुल पनाग, वाल्मिकी नाईक, रापोणकार संघटनेचे उपाध्यक्ष दामसो मेंडीस, प्रदीप घाडी आमोणकर व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. सुरूवातीला घेण्यात आलेल्या सभेत गुल पनाग यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ‘आप’च्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करताना आपल्या मनोगतात स्पष्ट केले की ,येथे गोव्यात नवा इतिहास घडवूया. मला आशा आहे की येथे नक्कीच परिवर्तन घडेल. वाल्मिकी नाईक आपल्या भाषणात म्हणाले की, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रापोणकरांवर पोलिसांनी लाठीमार केलाच नाही. हे त्यांनी केलेले विधान खोटे आहे. रापोणकार संघटनेचे उपाध्यक्ष मेंडिस यांनी आपल्या भाषणात सरकारच्या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. आम्हाला पोलिसांनी नाहक मारहाण केली. पणजी येथे पोलीस कोठडी असताना पेडणे येथील कोठडीत रापोणकारांना डांबुन ठेवण्यात आले. आप सोडल्यास राज्यातील कोणत्याही पक्षाने या घटनेची साधी चौकशीही केली नाही.
या सभेनंतर रापोणकार संघटनेचे उपाध्यक्ष मेन्डिस यांनी रॅलीला बावटा दाखविला.