‘लस उत्सव’ मोहिमेचा भाजपकडून राजकीय लाभ

0
74

>> कॉंग्रेसची मुख्य सचिवांकडे तक्रार

गोवा सरकारने सुरू केलेल्या ‘लस उत्सव’ मोहिमेचा भाजपचे काही पदाधिकारी राजकीय लाभ उठवत असल्याचे पत्र गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांना लिहिले आहे. भाजपचे काही पदाधिकारी काही नगरपालिका प्रभागांत कोविड लसीकरणाची शिबिरे आयोजित करू लागले असल्याचे मुख्य सचिवांच्या नजरेस आणून दिले आहे.

या शिबिरासाठीची जाहिरात समाजमाध्यमांवर चालू असून भाजपचे हे पदाधिकारी स्वतःच्या छायाचित्रांसह या शिबिरांची जाहिरात करत आहेत, असे चोडणकर यांनी, मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे. या गोष्टीला आपला आक्षेप असल्याचे चोडणकर यांनी सांगितले. खास करून ज्या पालिका निवडणुका आता होणार आहेत, त्या ठिकाणी अशा शिबिरांचे आयोजन केले जात असून हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे चोडणकर यांनी मुख्य सचिवांच्या नजरेस आणून दिले आहे.