लखीमपूर खीरीत हिंसाचार; ८ ठार

0
44

उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील कथित कारच्या अपघातावरून काल मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लखीमपूर खीरी येथील वातावरण कमालीचे तापले आहे. विशेष म्हणजे मृत्यू झालेल्या आठ जणांमध्ये चार आंदोलक शेतकरी, तर चारजण एका प्रमुख राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीच्या तिकुनिया भागात मोठा हिंसाचार उफाळला असून, आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील कार गेल्याने दोन शेतकर्‍यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त सुरुवातीला समोर आले होते. ही घटना घडल्याने गोंधळ उडाला आणि घटनास्थळी उपस्थित संतप्त शेतकर्‍यांनी तीन वाहने पेटवून दिली.