लक्ष्य, गायत्री, कुमार विजयी

0
116

लक्ष्य सेन याच्यासह गायत्री गोपीचंद व कार्तिकेय गुलशन कुमार या भारतीय बॅडमिंटनपटूंनी काल बुधवारी बीडब्ल्यूएफ ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेच्या ‘अंतिम १६’ संघात स्थान मिळविले. आठव्या मानांकित आकार्शी कश्यप, अश्मिता चलिहा व राहुल भारद्वाज यांना मात्र चौथ्या फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. १६ वर्षीय लक्ष्य याने चीनच्या ली शिफेंग याला चौथ्या फेरीत २१-१६, २१-११ असे ३६ मिनिटांत गारद केले. तर कुमारने कॅनडाच्या ब्रायन यांग याला २१-१५, २१-१२ असा धक्का दिला. गायत्रीला मात्र मुलींच्या एकेरीत विजयासाठी तीन गेमपर्यत झुंजावे लागले. कडव्या संघर्षानंतर तीने डेन्मार्कच्या मिचेल स्कोडस्ट्रप हिला १९-२१, २१-१८, २१-१७ असे हरविले. कश्यपला व्हिएतनामच्या थी आन थू वू हिने २१-१६, २१-१८ असे पराभूत केले. तर नवव्या मानांकित चासिनी कोरेपापने चलिहा हिचा प्रतिकार २२-२४, २१-१९, १७-२१ असा मोडून काढला. अटीतटीच्या लढतीत आर्नोड मर्कल याने भारद्वाजला १९-२१, २१-१०, १४-२१ असे हरविले.