लक्ष्मण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

0
166
दिग्गज व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांना या व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यंगचित्रकार नितीन पाटील यांनी वाहिलेली आदरांजली.

रविवारी निधन झालेले नामवंत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्यावर काल पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
लक्ष्मण यांच्यावरील अंत्यसंस्कारांआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे मंत्री विनोद तावडे, मनसे प्रमुख राज ठाकरे व अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.मुख्यमंत्री फडणवीस यांनी नंतर लक्ष्मण यांचे स्मारक राज्य सरकार उभारणार असल्याची घोषणा केली. लक्ष्मण केवळ व्यंगचित्रकार नव्हते. या माध्यमातून त्यांनी नेहमीच काही तरी सांगितले अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. लक्ष्मण हे एक महान राजकीय भाष्यकार होते अशा शब्दात केंद्रीय मंत्री जावडेकर यांनी त्यांचा गौरव केला महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर यांनी लक्ष्मण हे आम आदमीचे सर्वात शक्तीशाली प्रतिनिधी होते अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.