लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी होऊन काहीजणांना प्राणास मुकावे लागले व अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर प्रशासन देवस्थान समिती जागृत झाली असून देवस्थान समितीने यापुढे लईराई देवीच्या धोंडांनी रीतसर नोंदणी करावी व सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करून त्याप्रमाणे नोटीस काढली आहे. देवस्थानचे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी यासंदर्भात माहिती देताना देवीच्या धोंड भक्तांनी ओळखपत्रासह दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे देवस्थान समितिकडे सुपूर्द करून रीतसर नोंदणी करावी असे देवस्थान समितीने म्हटले आहे. दरवर्षी धोंडा मध्ये वाढ होत असते आता आम्ही नोंदणी सक्तीची केलेली असून त्यांना अधिकृत ओळखपत्र व इतर बाबतीत नोंदणी सक्तीची करण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चित संख्याही समजेल. देवस्थान समिती केलेल्या या आव्हानाला धोंड भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन दीनानाथ गावकर यांनी केले आहे.