लंडनमधील भुयारी रेल्वे स्थानकावर स्फोटात २२ जखमी : जीवितहानी नाही

0
106
Members of the emergency services work near Parsons Green underground tube station in west London on September 15, 2017, following an incident on an underground tube carriage at the station. Police and ambulance services said they were responding to an "incident" at Parsons Green underground station in west London on Friday, following media reports of an explosion. A Metro.co.uk reporter at the scene was quoted by the paper as saying that a white container exploded on the train and passengers had suffered facial burns. / AFP PHOTO / Daniel LEAL-OLIVAS

ब्रिटनची राजधानी लंडन शहराच्या दक्षिण पश्‍चिम भागातील एका भूयारी रेल स्थानकावर काल सकाळी झालेल्या स्फोटात २२ जण जखमी झाले. स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी या घटनेला दहशतवादी घटना असे संबोधले आहे.
सदर स्थानकावरील एका बादलीतील स्फोटकाचा स्फोट होऊन त्यातील आगीमुळे बहुतेकांच्या चेहर्‍यांना इजा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात मेट्रोपोलिटन पोलिसांच्या एका निवेदनात म्हटले आहे की या क्षणी स्फोटाचे निश्‍चित कारण सांगणे शक्य नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार काल सकाळी वर्दळीच्या वेळी पार्सन्स ग्रीन स्टेशनवर डिस्ट्रिक्ट लाईन ट्युब ट्रेन पोचली असताना हा स्फोट झाला. या स्फोटानंतर दाखल झालेल्या रुग्णवाहिकांमधून १८ जखमींना इस्पितळात नेण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त मार्क रौले यांनी सांगितले. मात्र कोणाला अटक करण्यात आली आहे काय यावर त्यांनी उत्तर दिले नाही.
स्फोटामुळे जखमी होण्याबरोबरच यावेळी झालेल्या धावपळीतही अनेकजण खाली पडून तुडवले गेल्यानेही जखमी झाल्याचे सांगण्यात आले.