रेव्ह पार्टी आयोजन प्रकरणी प्रमुख आरोपीस जामीन

0
135

गेल्या १५ ऑगस्ट रोजी वागातोर येथे रेव्ह पार्टीचे आयोजन केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलिवूडमधील अभिनेता कपिल झवेरी याला काल पणजीच्या विशेष सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला.

न्यायाधीशांनी आरोपीस पन्नास हजार रुपयांची वैयक्तिक हमी व तेवढ्याच रकमेच्या हमीदारावर जामीन मंजूर केला. आपले पारपत्र पोलिसांकडे द्यावे व पुढील पंधरा दिवस पोलीस स्थानकात हजेरी लावावी अशी अट झवेरी याला न्यायालयाने घातली आहे. त्याला गोव्याबाहेर जाण्यास तसेच समुद्रकिनार्‍यावर जाण्यास त्यांना बंदी घालण्यात आली आहे.