रेल्वे रुळांवर मानवी विष्ठा आणि इतर कचरा फेकला जातो, अनेक ठिकाणी रुळांकडे प्रात्यविधीसाठी बसतात, त्यावर उपाययोजना करण्यास सरकारने तातडीने लक्ष द्यावे असे काल राष्ट्रीय हरित लवादाने म्हटले. रेल्वे बोर्डाने तातडीने यासाठी बैठक बोलवावी असे एनजीटीचे अध्यक्ष न्या. स्वतंत्र कुमार यांनी सांगितले. हा एक गंभीर पर्यावरणीय प्रश्न असल्याचे सांगून लवादाने उपायोजनांसाठी पावले उचलण्यासंबंंंधी दिलेल्या आदेशाचे अजून पालन झाले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.