आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही देशातील रेल्वे मार्ग बंद करू असा इशारा आंदोलक शेतकर्यांनी केद्र सरकारला दिला आहे. रेल्वेमार्ग बंद करण्याचे आंदोलन केव्हा करणार ती तारीख लवकरच जाहीर करू असेही शेतकर्यांनी म्हटले आहे. आमचे आंदोलन या पुढील काळात अधिक तीव्र होणार असून राष्ट्रीय राजधानीकडे येणारे आणि जाणारे सर्व राजमार्ग आम्ही बंद करणे सुरू करू, असेही शेतकरी नेते म्हणाले. शेतकरी गेल्या दोन आठवड्यांपासून सिंघू बॉर्डरवर धरणे धरून बसले आहेत.
शेतकरी नेते बूटासिंह यांनी, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही सर्व रेल्वेमार्ग बंद करू. रेल्वेमार्गांवर संपूर्ण भारतातील लोक जातील असेही ते पुढे म्हणाले. संयुक्त शेतकरी मंच या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.