रुद्रम १ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

0
258

काल शुक्रवार दि. ९ रोजी डिफेन्स रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनद्वारे (डीआरडीओ) डीआरडीओद्वारे तयार करण्यात आलेल्या अँटी रेडीएशन मिसाईल रुद्रम-१ क्षेपणास्त्राची सुखोई-३०द्वारे यशस्वी चाचणी करण्यात आली. डीआरडीओतर्फे ओडिशाच्या समुद्र किनारी असलेल्या तटावर सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी हे परिक्षण झाले.

संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असलेले रुद्रम-१ हे क्षेपणास्त्र शत्रूवर कितीही उंचावर डागले जाऊ शकते. तसेच कुठल्याही प्रकारच्या सिग्नल तसेच रेडिएशन पकडण्यासाठी तत्पर आहे. त्याशिवाय आपल्या रडारमध्ये रेडिएशन घेऊन नष्टही करू शकते. विशेष म्हणेजे रुद्रम-१ या क्षेपणास्त्राला सुखोई आणि तेजस या दोन्ही लढाऊ विमानांमध्ये वापरले जाऊ शकते.
दरम्यान, रुद्रम-१ च्या यशस्वी परिक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.