>> गोमेकॉत कॅथलॅब व सीसीयू विभागाचे उद्घाटन
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते काल गोमेकॉतील सुपर स्पेशालिटी विभागात अत्याधुनिक कॅथलॅब व सीसीयू विभागाचे उद्घाटन करण्यात आले. आता ही कॅथलॅब व सीसीयू विभाग सुरू होणार असल्याने रुग्णांना सेवा व उपचार ह्यासाठी एक एक महिना वाट पाहत थांबावे लागणार नसल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. आता रुग्णांना जास्तीत जास्त केवळ 10 दिवस उपचारासाठी वाट पहावी लागणार असल्याचे राणे म्हणाले.
या कॅथलॅब व सीसीयूमुळे शस्त्रक्रियांसाठीची अत्याधुनिक अवजारे व उपकरणे उपलब्ध झालेली असल्याने निदान व शस्त्रक्रिया चांगल्या प्रकारे करता येणार असल्याचे ते म्हणाले. हृदय रुग्णांसाठी ह्या कॅथलॅब सेवेचा फार मोठा उपयोग होणार आहे. ही कॅथलॅब म्हणजे गोमेकॉतील सेवाभावी दिवंगत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मंजुनाथ देसाई यांच्यासाठी एका प्रकारे श्रद्धांजली असल्याचे राणे यांनी सांगितले.