Home बातम्या राष्ट्रीय लष्कर महाविद्यालयप्रवेश परीक्षेसाठी अर्ज

राष्ट्रीय लष्कर महाविद्यालयप्रवेश परीक्षेसाठी अर्ज

0

देहराडून उत्तराखंड येथील राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालयात इयत्ता 8 वीच्या वर्ग प्रवेशासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7 वीच्या वर्गात शिकणाऱ्या किंवा इयत्ता 7 वी उत्तीर्ण मुले आणि मुली विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले आहेत. प्रवेश परीक्षा संबंधीत राज्यांतील निवडक केंद्रांवर 7 जून 2026 रोजी होणार आहे.
प्रवेश परीक्षेसाठी उमेदवाराचे वय साडे अकरा वर्षे ते तेरा वर्षे असावी. म्हणजे उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2014 अगोदर आणि 1 जुलै 2015 नंतर झालेला असावा. गणित, सर्वसामान्य ज्ञान आणि इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा होईल. तोंडी परीक्षेची तारीख आणि वेळ नंतर कळविण्यात येईल. परीक्षेचा निकाल राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालयाच्या ुुु.ीळाल.र्सेीं.ळप. या वेबसाईटवर अपलोड करण्यात येण्ाार आहे.

सध्या वार्षिक शुल्क सर्वसामान्य वर्गांसाठी 98650/- रूपये आणि एससी/एसटी उमेदवारांसाठी 81850 /- रूपये आहे. जी वाढण्याची शक्यता आहे. प्रवेशाच्या वेळी 50,000/- रूपये सुरक्षा ठेव भरायला पाहिजे जी छात्र महाविद्यालयातून पदवीधर झाल्यानंतर परत करण्यात येईल.
विहित नमुन्यातील प्रतीरूप अर्ज दोन पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, उमेदवाराचा रहिवासी दाखला, जन्म दाखला, एससी/एसटी दाखला छायाचित्रासह जन्म तारीख आणि शिकत असलेल्या वर्गाची प्रमाणीत माहिती देणारी शाळा मुख्याद्यापकांचा दाखला, आधार कार्डाची फोटोकॉपी (दोन्ही बाजूने) दाखल्यासह संबंधीत राज्य सरकारकडे 5 एप्रिल 2026 पर्यंत अर्ज सादर करावे.

माहिती पुस्तिका तथा विहित नमुन्यातील अर्ज आणि जुन्या प्रस्नपत्रिकांची पुस्तिका ुुु.ीळाल.र्सेीं.ळप. या वेबसाईटवर ऑनलाईन भरून मिळवावा. तसेच द कमांडंट, राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालय, देहराडून, एचडीएफसी बँक, बल्लुपूर चौक, देहराडून (बँक कोड-1399) उत्तराखंड 248004 या पत्त्यावर वरील रकमेचा डिमांड ड्राफ्ट काडून मिळविता येतो.